पाकचा मित्र तुर्कीविरुद्ध ‘ऑपरेशन’ सुरू? भारतीय वायुदल प्रमुखांनी दिली शत्रु राष्ट्राला भेट.

भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्या तुर्कीच्या सर्वात मोठ्या शत्रु राष्ट्राला भेट दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला शह देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.भारत ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीच्या विरोधात काही ‘ऑपरेशन’ सुरू करत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण भारतीय वायुसेनेचे प्रमुख अमर प्रीत सिंह हे तुर्कीच्या सर्वात मोठा शत्रु असलेल्या ग्रीसच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.

ग्रीस आणि तुर्की यांचे संबंध फार पूर्वीपासूनच चांगले नाहीत. तुर्कीला उत्तर देण्यासाठी भारताने ग्रीससोबत लष्करी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा केली जात होती. ग्रीसला पोहोचल्यावर भारतीय वायुसेनेचे प्रमुख ए. पी. सिंह यांचे स्वागत हेलेनिक एअर फोर्सचे चीफ लेफ्टनंट जनरल दिमोस्थेनीस ग्रिगोरियादिस यांनी केले. बघायला गेलं तर हा दौरा नेहमीच्या लष्करी सहकार्याचा भाग आहे, असं वाटू शकतं. पण याचे राजकीय आणि धोरणात्मक अर्थ खूप जास्त आहेत.भारत आणि ग्रीस यांच्यात “इनियोचोस 23” आणि ‘इनियोचोस 25’ नावाचे युद्धाभ्यास होतात. ‘तरंग शक्ती’ या लष्करी सरावामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संबंध आधीपासूनच आहेत. पण वायुसेना प्रमुख ए. पी. सिंह यांच्या भेटीच्या वेळेमुळे आणि त्याच्या अर्थामुळे तुर्की नक्कीच चिंतेत असेल. तुर्कीने अलीकडच्या काळात पाकिस्तानशी जवळीक साधली असून पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कृत्यांना समर्थनही दिले आहे. ग्रीसला पोहोचल्यावर भारतीय वायुसेना प्रमुखांना हेलेनिक वायुसेना (HAF) च्या कामाबद्दल, उद्दिष्टांबद्दल आणि ऑपरेशन्सबद्दल माहिती देण्यात आली. यासोबतच दोन्ही देशांमध्ये ऑपरेशन्स आणि ट्रेनिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. ग्रीसच्या दौऱ्यात भारतीय वायुसेना प्रमुख, एचएएफजीएसच्या प्रमुखांसोबत हेलेनिक वायुसेनेच्या लढाऊ विंगला भेट देणार आहेत. त्याचबरोबर तातोईमधील डेकेलिया एअर बेसवर असलेल्या हेलेनिक वायुसेना अकादमीला देखील ते भेट देणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.