तर मी तुझी बदनामी करेन आणि…, अल्पवयीन मुलीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल; प्रकरणाने परिसरात खळबळ.

वाशिम जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मुलीला मिठी मारून तिच्यासोबत पळून येण्यास सांगितलं, अन्यथा बदनामी करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचा निर्णय घेतला. राज्यभरातील अनेक भागात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या विविध घटना समोर आल्या आहेत. अशीच एक भयंकर घटना वाशिममध्ये समोर आली आहे. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून, घाबरुन भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशनंतर्गत येणाऱ्या वाघळूद गावात प्रकार समोर आला आहे. मृत मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेमिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक विष्णू देशमुख याने एका अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये घुसून वाईट हेतूने तिला मिठीत कवटाळलं. त्यानंतर त्याने मुलीला तु माझ्या सोबत पळून चल, जर तु माझ्या सोबत पळून आली नाही, तर मी तुझी बदनामी करेन आणि जीवे मारेन, अशी धमकी आरोपीने अल्पवयीने तरुणीला दिली. आपली बदनामी होईल, तसंच आरोपीने दिलेल्या धमकीच्या भीतीपोटी, त्याच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विष प्राशन केलंघटनेनंतर मृत मुलीच्या काकाने शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीवरुन शिरपूर पोलीसांनी आरोपी अभिषेक विष्णू देशमुख, वय २५ रा. वाघळूद या नराधमाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तसंच त्याच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इमरान पठाण हे करत आहेत..

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.