इस्रायलने इराणविरुद्ध ‘ऑपरेशन रायजिंग लाईन’ सुरू केले. मोसादने इराणी अधिकाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अयातुल्ला अली खामेनेई यांना पाठिंबा देणे थांबवावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला.तेल अवीव: इराणविरोधात इस्रायलनं १३ जूनला ऑपरेशन रायजिंग लाईन सुरु केलं. याचसोबत इस्रायलनं शत्रू देशाविरोधात एक गुप्त मोहिमदेखील हाती घेतली. या मोहिमेच्या अंतर्गत इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादनं इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन धमकावलं. यरुशलम पोस्टनं याबद्दलचं एक वृत्त वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यानं प्रसिद्ध केलं आहे. या ऑपरेशनशी संबंधित तीन व्यक्ती आणि एक रेकॉर्डिंग यांच्या आधारे वृत्त देण्यात आलेलं आहे.










