43 वर्ष कट्टर शिवसैनिक, आता दादांच्या हस्ते ‘घड्याळ’; ठाकरेंना सोडताना बडा नेता म्हणतो, उद्धवजींवर मी…

गेले 43 वर्षे एक पक्ष, एक नेता, एक झेंडा या तत्त्वावर काम केलं. दहा वर्षात दोनदा विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांनी हुलकावणी दिली पण… महादेव बाबर काय म्हणाले?हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गेल्या 43 वर्षांपासून महादेव बाबर हे पुण्यामध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तीन वेळेस नगरसेवक आणि एकदा आमदार राहिलेल्या महादेव बाबर यांनी आपण विकासासाठी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे महाराष्ट्र टाईम ऑनलाइनशी बोलताना म्हटल आहे.गेले 43 वर्षे एक पक्ष, एक नेता, एक झेंडा या तत्त्वावर काम केलं. दहा वर्षात दोनदा विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांनी हुलकावणी दिली पण ते असू द्या. मात्र माझ्या भागात पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये विकास होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मला महायुतीमध्ये एकच व्यक्ती दिसते आणि ती म्हणजे अजित पवार. अजित पवार हा विकास निश्चित करतील आणि केवळ विकास व्हावा म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. विधानसभेत तिकीट मिळालं नाही म्हणून मी काही काळापुरता नाराज होतो पण आज मी शिवसेनेचा नेत्यापासून पक्षापर्यंत कोणावरही नाराज नाही केवळ विकास व्हावा यासाठी मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.

असं महादेव बाबर म्हणाले आहेत.हा बाळासाहेबांनी हाती दिलेला भगवा सोडण्याचा प्रश्न नाही ज्यावेळेस महाविकास आघाडी होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी अजित पवार एकत्र होतेच ना? परतही एक होऊ शकतात राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा सोडला आणि तो धरला हा प्रश्नच येत नाही केवळ विकास व्हावा यासाठीच मी आज पक्ष प्रवेश करत आहे. केवळ सत्ता म्हणून नाही तर ज्या पद्धतीने अजित पवारांची व्हिजन आहे विकास करण्याचा झपाटा आहे, जसं उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा विकास केला तसं अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा विकास केला आहे. एका शिवसैनिकाला अजित पवारांच्या विकासाची भुरळ पडली असंच समजा. असं देखील महादेव बाबर यांनी प्रवेशापूर्वी बोलताना म्हंटल आहे.महादेव बाबर हे सध्या ठाकरे गटात होते. पण सक्रिय नव्हते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची होती. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही जागा आपले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी राखून ठेवली. त्यामुळे महादेव बाबर नाराज झाले होते. नाराज महादेव बाबर यांनी महाविकास आघाडीचे काम देखील केलं नव्हतं. याचा फटका प्रशांत जगताप यांना निवडणुकीत बसला होता आणि त्यांचा पराभव देखील झाला होता.

महादेव बाबर यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पुणे शहरातील स्थानिक शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी तर हडपसरची जागा ही शिवसेनेला सुटली असून आमचे उमेदवार हे महादेव बाबर असतील असं घोषित केलं होतं. सुषमा अंधारे यांच्या या घोषणेनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळालं होतं. अखेर वाटाघाटीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे महादेव बाबर हे नाराज झाले होते.महादेव बाबर यांनी 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीत महादेव बाबर यांचा विजय झाला होता. महादेव बाबर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत शिवरकर यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. त्यांना या निवडणुकीत 65 हजार 517 इतके मतं मिळाली होती.त्यानंतर 2014 साली भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मोदी लाटेत महादेव बाबर यांचा भाजपचे योगेश टिळेकर यांनी 30 हजार मतांनी पराभव केला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.