ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाला दिली जोरदार धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, अकोल्यात भीषण अपघात.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याजवळ भीषण अपघात झाला. बाभूळगाव येथे ट्रक आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, पोलीस तपास करत आहेत.अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या बाभूळगाव जवळ झालेल्या भीषण अपघात ात दोन जनांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकने प्रवाशी ऑटोला जोरदार धडक दिली. ऑटोतील प्रवाशी बाहेर फेकले गेले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले तर ट्रकचालक हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापुर ते पातुर रोडवरील आयटीआय कॉलेजसमोर ट्रक व ऑटोची जोरदार धडक झाली. सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पातुरकडून प्रवासी ऑटो क्रमांक एमएच 30 बीसी 2071 हा अंबाशी येथे जात असताना ट्रक क्रमांक MH 18 बीजी 8494 याने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ऑटोला मागून जबर धक्का मारल्याने सदर ऑटो हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक 09 4426 ला धडकला.ऑटो प्रवासी पियुष रवींद्र सतरकर (वय 13) राहणार सिंधी कॅम्प, अकोला व लिलाबाई ढोरे (वय 5) राहणार लाखनवाडा हे दोघेही जागीच ठार झाले. सुरेंद्र चतरकर (वय 45), रवींद्र चतरकर (वय 52), रूपचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय 65) हे गंभीर जखमी झाले असून पातुर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले असून पुढील कारवाई पातुर पोलीस करीत आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविले तर ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचीही माहिती मिळतंय.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.