औषधांचा घातक कचरा भलत्याच ठिकाणी पुरवायचे; पोलिसांनी धाड टाकली अन् मोठी पोलखोल.

औषधी कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या घातक कचऱ्याच्या माध्यमातून रासायनिक पावडरची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनडीपीएस पथकाने टाकलेल्या छाप्यात गोडाऊन मध्ये मोठा साठा आढळून आला.औषधी कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या घातक कचऱ्याच्या माध्यमातून रासायनिक पावडरची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनडीपीएस पथकाने टाकलेल्या छाप्यात गोडाऊन मध्ये मोठा साठा आढळून आला आहे. या पावडरचा नशेसाठी वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.वृत्तानुसार, वाळूज येथील एका औषधी कंपनीतील घातक कचरा ट्रकच्या माध्यमातून शासन नियुक्त कंपनी ऐवजी बबन खानच्या साजापूर येथील गोडाऊनमध्ये जात होता.

त्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन नशेसाठी याचा वापर होत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली. एनडीपीएस पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी औषधी कंपनीतून जाणारे दोन ट्रक अडवले. तपासणी केली असता ट्रकच्या गेट पासवर बॅरल, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या असा उल्लेख केलेला दीड किलो पावडर आढळून आले. मात्र या पावडरचा मात्र त्यात उल्लेख नव्हता. या ट्रकची तपासणी केली असता शासन नियुक्त कंपनीत जाण्याऐवजी हे ट्रक साजापूर येथील बबन खान यांच्या गोडाऊनमध्ये जात होते.दरम्यान एनडीपीएस पथकाने केलेल्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पावडरचा साठा आढळून आला आहे.

पोलिसांनी यातील काही गोडाऊन सील केले आहेत. या पावडरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची निर्मिती केली जाते. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे तपासात समोर आले आहे.औषधी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी औषधी कंपनीतील पावडरचा वापर नशेसाठी विक्री करण्यासाठी करत असल्याचा प्रकार तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. या घटनेनंतर कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकले होते. मात्र कंपनीतून बाहेर पडत असताना कर्मचाऱ्यांनी ५ किलो पावडर चोरली होती. या घटनांमुळे वाळूज भागामध्ये असलेल्या औषधी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी सुरू असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.