वडिलांसोबत मुलगी बाइकवरुन निघाली पण वाटेत दोन कारने त्यांना घेरले, अपहरणाचा प्रयत्न; प्रसंगी बापाने जे केले…

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथे अपहरणाची मोठी घटना टळली आहे. चौरई पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी संध्याकाळी गृहस्थ आपल्या पत्नी आणि मुलीसोबत त्यांच्या नातेवाईकांना भेटायला निघाले होती. यावेळी वाटेत कारमधील अज्ञात लोकांनी मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांच्या तत्परतेमुळे अपहरणाची घटना टळली.मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथे अपहरणाची मोठी घटना टळली आहे. चौरई पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी संध्याकाळी गृहस्थ आपल्या पत्नी आणि मुलीसोबत त्यांच्या नातेवाईकांना भेटायला निघाले होती. यावेळी वाटेत कारमधील अज्ञात लोकांनी मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांच्या आणि गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत आरोपीची गाडी पेटवून दिली.

पोलिसांनी आरोपी विनोद रघुवंशीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वृत्तानुसार, चौराई पोलीस स्टेशन परिसरातील सांख गावाजवळ ही घटना घडली. रामपुरी गावातील एक कुटुंब दुचाकीवरून छपर गावाकडे निघाले होते. तिचे आई वडिल आणि त्यांची मुलगी असे कुटुंब आहे. ते त्यांच्या नातेवाईकाच्या घरी जात होते. वाटेत सांख आणि ग्रातिया दरम्यान असणाऱ्या जंगलात दोन चारचाकी वाहनांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.दरम्यान, मुलीच्या वडिलांना आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचे जाणवले. त्यांनी धोका समजून दुचाकीचा वेग वाढवला आणि सांख गावात जाऊन स्थानिक लोकांना हा प्रकार सांगितला आणि मदत मागितली.

गावकरी लगेच मदतीसाठी धावले. गावकरी येत असल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला होता. पळून जाताना मात्र त्यांचे इको चारचाकी वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि काही अंतरावर उलटले. जे जंगलाजवळ उलटले होते.संतप्त ग्रामस्थांनी वाहनांना घेरले पेटवून दिले. सुदैवा म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, जळालेल्या गाडीचा क्रमांक एमपी २८ झेडसी ५७०४ आहे. पोलिसांना गाडीच्या मालकावरही संशय आहे. तोही या कटात सहभागी होता? का याचा तपास पोलीस करत आहेत. चौराई पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक लता मेश्राम यांनी या घटनेची अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जामुन टोला येथील रहिवासी विनोद रघुवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.