मुंबईचा समुद्र खवळणार! पुढील पाच दिवस मोठ्या भरतीचे, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना.

समुद्राच्या भरतीवेळी मोठा पाऊस झाल्यास अनेक ठिकाणे जलमय होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.समुद्राला २४ जून ते २८ जूनपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १९ वेळा समुद्राला मोठी भरती असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. यामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे. समुद्राच्या भरतीवेळी मोठा पाऊस झाल्यास अनेक ठिकाणे जलमय होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.मुंबईत गेल्याकाही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचे मुंबई पालिकेचे आवाहन.

लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पाऊसामुळे धरणाची पातळी ही ७५.९८ मीटर झाली आहे. हे धरण सध्या ४६.७८ टक्के भरलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईला १९ ऑक्टबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.पालघर जिल्ह्यात गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागांतील तलासरी व विक्रमगड तालुक्यांतील नद्यांना पूर आल्याने पुलारून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६३.७ मिमी पाऊस झाला असून, आत्तापर्यंत जिल्ह्यात ४०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पालघर-मनोर या राष्ट्रीय महामार्गावर सलग दोन दिवस वादळीवारे आणि पावसामुळे दोन ठिकाणी झाडे पडल्याने हा महामार्ग दोन दिवस बंद पडला. त्यामुळे या महामार्गावरून मुंबई व गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे झाड कापून बाजूला सारण्याच काम करण्यात येत आहे. झाड कापून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रविवारी व सोमवारीदेखील जवळपास साडेतीन तासांहून अधिक कालावधी लागल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.