लासलगावी शेतकऱ्यांचा ठिय्या; 4 वर्षांपासून विम्याचा लाभ नाही, SBIने फसवणूक केल्याचा आरोप.

बँकेने आरोग्य विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.भारतीय स्टेट बँक लासलगाव शाखा आणि ‘एसबीआय’ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि. २३) ठिय्या आंदोलन सुरू केले. बँकेने आरोग्य विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सन २०२२ मध्ये एसबीआय-जी आरोग्य प्लस योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधून ऑनलाइन रक्कम कपात करण्यात आली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विम्याचे फायदे सांगून खातेदारांची सहमती घेतली. परंतु, प्रत्यक्षात त्यांचा विमा उतरवलाच गेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, चार वर्षे उलटूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या विमा पॉलिसी मिळालेल्या नाहीत.

वारंवार संपर्क साधूनही बँकेकडून दाद दिली नसल्याचे बोचरे यांनी सांगितले. पीडित खातेदारांनी या गंभीर समस्येबाबत बँक आणि इन्शुरन्स कंपनीशी वारंवार संपर्क साधला. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे तातडीच्या आरोग्यविषयक गरजांच्या वेळी विम्याअभावी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलकांशी संपर्क साधून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, पं. स. चे माजी सभापती शिवा सुरासे,

भाऊसाहेब बोचरे, राजाराम मेमाणे, धनंजय जोशी, डॉ. विकास चांदर, केशव जाधव, संतोष पानगव्हाणे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला.देशातील राष्ट्रीयीकृत आणि नावाजलेल्या बँकेच्या शाखेतच जर ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक होत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. हे केवळ दुर्लक्ष नसून, यामागे मोठा आर्थिक गैर व्यवहार असण्याची भीतीही आंदोलकांनी व्यक्त केली.मी माझ्या वतीने वरिष्ठ कार्यालयास सर्व माहिती दिली असून, अद्याप त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.