भास्कर जाधव यांची पक्षातील ‘बडव्यां’वर टीका; पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित.

भास्कर जाधव यांनी मात्र पक्षाच्या एका बैठकीतच ‘बडव्यां’वर टीका केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. नेतेपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना एकाही उमेदवाराला एबी फॉर्म देताना आपल्याला विचारण्यात आले नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. राजकारणात पक्षातून बाहेर पडताना पक्षातील नेत्यांवर खापर फोडणारे अनेक नेते असतानाच, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी मात्र पक्षाच्या एका बैठकीतच ‘बडव्यां’वर टीका केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. नेतेपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना एकाही उमेदवाराला एबी फॉर्म देताना आपल्याला विचारण्यात आले नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच, आजूबाजूचे लोक फुटत असताना आपल्या नेत्यांना त्याचा पत्ता कसा लागत नाही, असा प्रश्न विचारत पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या (उबाठा) जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात स्थानिक पातळीवर कोणासोबत युती करावी याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख तसेच संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. तत्पूर्वी जाधव यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी पक्षातील ‘बडव्यां’वर बोट ठेवल्याचे समजते. ‘पक्षात अनेक नेत्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या असताना, प्रत्यक्षात पक्षात काय घडते हेच त्यांना कळत नाही. माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले. मात्र मला ते दिल्यानंतर समजले. ते कोणी दिले, कशाप्रकारे दिले याची माझ्याकडे काहीच माहिती नाही. ज्या भागाची जबाबदारी आहे, तिथल्या गोष्टी समजायला हव्यात’, असे त्यांनी नमूद केल्याचे समजते.जाधव यांनी यावेळी पक्षातून फुटणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केल्याचे समजते. ‘आपल्या पक्षात असे अनेक नेते आहेत, ज्यांना आजूबाजूचे लोक फुटून दुसऱ्या पक्षात जात असताना शेवटपर्यंत माहिती नसते. हे लोक फुटतातच कसे, त्यांच्या काही व्यथा वा अडचणी आहेत तर त्या या संबंधित नेत्यांकडून कशा सोडवल्या जात नाहीत’, अशी विचारणा त्यांनी केल्याचे समजते.

यावेळी जाधव यांच्या शेजारी खासदार संजय राऊत बसले होते. ही बैठक संपल्यानंतर गेल्या काही दिवसांत भाऊ चौधरी, सुधाकर बडगुजर, चंद्रहार पाटील हे नेते कसे फुटले याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये रंगल्याचे सांगण्यात आले.२००९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामदास कदम यांनी विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, ‘भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची पात्रता नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट मिळवून दिले होते’, अशी टीका कदम यांनी केली. ‘शिंदेसोबत जाधवही सुरतला गेले होते. पण शिंदेंनी त्यांना सोबत येण्यास नकार दिला’, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.