हाताला फ्रॅक्चर, पायाला सूज; आईची हात जोडून विनवणी, तरी मुंब्रा अपघातातील जखमीची ठाणे मनपा रुग्णालयात फरपट.

पायाला मुका मार लागलेल्या ठिकाणी सूज कायम असल्याने सोमवारी आदेश फॉलोअपसाठी रुग्णालयात गेला. रुग्णालयात पोहचलेल्या आदेशला ओपीडीमध्ये जाण्यास सांगितले. मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये लोकलमधून पडून हात फ्रॅक्चर आणि पायाला मुका मार लागलेल्या आदेश भोईर या तरुणाला ठाणे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान फरपट सहन करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पायाला मुका मार लागलेल्या ठिकाणी सूज असल्याने सोनोग्राफी करण्यास डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना सोनोग्राफीशिवाय घरी पाठवण्यात आले. त्यामुळे कळवा ते अटगाव असा प्रवास करत आदेश भोईर उपचाराशिवाय परतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.शहापूर तालुक्यातील आटगाव येथे राहणारा आदेश भोईर नवी मुंबईमध्ये कामावर जात असताना पंधरा दिवसांपूर्वी मुंब्य्राजवळील अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. हाताला फ्रॅक्चर आणि पायाला मुका मार लागलेल्या आदेशचे हात प्लॅस्टर करून त्याला घरी सोडण्यात आले होते.पायाला मुका मार लागलेल्या ठिकाणी सूज कायम असल्याने सोमवारी आदेश फॉलोअपसाठी रुग्णालयात गेला.

रुग्णालयात पोहचलेल्या आदेशला ओपीडीमध्ये जाण्यास सांगितले. तेथील केस पेपरची गर्दी, त्यानंतर डॉक्टरला भेटण्यासाठी गर्दी ओलांडून ते डॉक्टरांपर्यंत पोहचला. आदेश यांची प्लास्टर काढण्यात आले तसेच त्याच्या पायाला सूज असल्याने त्याची सोनोग्राफी करण्यास सांगितले. परंतु सोनोग्राफीसाठी पोहचलेल्या आदेशला विविध कारणे सांगून दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगण्यात आले.रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून एक कर्मचारी रुग्णालयात पोहचला परंतु त्याच्या विनंतीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांना या प्रकरणाची कल्पना देऊनही आदेश यांची सोनोग्राफी होऊ शकली नसल्याने अखेर त्यांनी पुन्हा घरी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून असंवेदनशीलता दाखवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.आटगाव ते ठाणे आणि तेथून कळवा हॉस्पिटल असा प्रवास करून माझी आई मीना भोईर आणि मी हॉस्पिटलला पोहचलो.

पायाची सूज वाढल्याने चालणे कठीण होत असूनही आम्ही उपचारासाठी पोहचल्यानंतर सोनोग्राफीसाठी आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये फिरावे लागले. माझ्या आईने तेथे विनवण्या करूनही सोनोग्राफी केली गेली नसल्यामुळे आम्हाला पुन्हा उपचारासाठी उद्या यावे लागणार आहे. रेल्वे आणि रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही.मुंब्रा अपघातातील जखमींना उपचाराचा खर्च देण्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात येऊनही जखमींना उपचारासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. रेल्वे अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे जखमी प्रवाशी गेली पंधरा दिवसांपासून कामावर पोहचू शकलेले नाहीत. घरातील एकमेव कमावते असूनही त्यांना या अपघातामुळे घरी बसावे लागत आहे. पुढील दोन ते तीन महिने त्यांना या जखमांमुळे कामावर जाता येणार नाही. त्यामुळे या कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत असून रेल्वे प्रशासनाने आणि राज्य शासनाने जखमींच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.