93 वर्ष आणि 591 कसोटी… भारताच्या वाघांनी रचला इतिहास, असा विक्रम प्रत्येक चाहत्याला वाटेल अभिमान.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्स कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. भारताने इंग्लंडला जिंकण्यासाठी 371 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. नव्या दमाच्या खेळाडूंनी मोठा पराक्रम नावावर केला आहे.लीड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामनास सुरू आहे. सामन्यावर भारताने आता चांगली पकड मिळवली आहे. चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले. भारताच्या फलंदाजांनी इग्लंडच्यास गोलंदाजांचा घाम काढल्याचं पाहायला मिळालं. या कसोटीमध्ये भारताच्या फलंदाजांनी पहिल्या डावात 400 पेक्षा जास्त आणि दुसऱ्या डावात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या कसोटीमध्ये भारताच्या खेळाडूंनी मिळून पाच शतके ठोकलीत. या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक अनोखा विक्रम केला आहे. भारतीय संघ 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि त्याने या सामन्यापर्यंत 591 कसोटी सामने खेळले आहेत. पण यापूर्वी कधीही त्यांच्या खेळाडूंनी पाच शतके झळकावली नव्हती. शुभमन गिल, पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या डावात शतके झळकावली. जयस्वाल ज्याने डावाची सुरुवात केली, त्याने पहिल्या डावात 101 धावा केल्या होत्या. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या डावात 147 धावा केल्या. पंतने 134 धावांची खेळी केली. या तीन शतकांच्या बळावर भारताने पहिल्या डावात 471धावांचा मजबूत स्कोर उभा केला.

ऋषभ पंतने या सामन्यात इतिहास रचला. तो कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणारा केवळ दुसरा कीपर ठरला आहे. यापूर्वी अँडी फ्लॉवरने हा पराक्रम केला होता. पंत पहिला असा यष्टीरक्षक आहे ज्याने ही कामगिरी विदेशात केली आहे. फ्लॉवरने हा कारनामा त्याच्या घरच्या मैदानावर हरारे येथे केला होता.राहुलने देखील नववे कसोटी शतक ठोकले. इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून त्याचे हे तिसरे शतक होते. आता तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा आशियाई सलामीवीर बनला आहे. यापूर्वी हा विक्रम संयुक्तपणे सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विजय मर्चंट, रवी शास्त्री, तमीम इक्बाल आणि राहुल यांच्या नावावर होता, ज्यांनी इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून दोन शतके झळकावली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.