मुंबईत रात्रभर पाऊसजोर, ठाण्यालाही झोडपले; वाहतूक खोळंबली, लोकलविलंबामुळे चाकरमान्यांची तारांबळ.

राज्यात मान्सूनने विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरु आहे, परंतु रात्रीपासून पावसाने मुंबईला झोडपले आहे. शहरासह पश्मिम आणि पूर्व उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.राज्यात मान्सूनने विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरु आहे, परंतु रात्रीपासून पावसाने मुंबईला झोडपले आहे. शहरासह पश्मिम आणि पूर्व उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही भागांत पाणी साचले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे रस्ते वाहतुकीसोबतच लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास कामाला निघालेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे.

मुंबईसह लगतच्या ठाणे शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जागोजागी पाणी साचले असून वाहनचालकांची तसेच चाकरमान्यांची तारांबळ उडाली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांना जलाशयाचे स्वरुप आले आहे. लोकल विलंबामुळे सकाळी मुंबईकडे कार्यालयात निघालेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.मुंबई मध्ये गेल्या २४ तासांत लक्षणीय पावसांची नोंद झाली आहे. शहरात ५४.६७ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व भागात ५६.१८ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम मुंबईत ४०.०२ मिनी पाऊस पडला आहे.

तर पुढील दोन दिवस पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शहरासह उपनगरांत तसेच ठाण्याकही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील किनारपट्टीवर हाय टाईडचा इशाराही देण्यात आला आहे. सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास समुद्रात ४.५९ मीटरच्या उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर रात्री १०.५९ वाजता सुद्धा उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन कऱण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.