तंत्र-मंत्र आणि भूतबाधेच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा, दुसऱ्यांच्या समस्या सोडवणारे मात्र स्वतःच अडकले समस्येत, प्रकरण काय?

 समाजात एकाहून एक फसवेगिरी करणारे लोक अश्याच अडचणीत सापडलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. आणि लाखोंचा गंडा घालतात. कधी कधी कोणाच्या जीववरही बेततं. अशावेळी आपल्या विवेकबुद्धीने, येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणं ही आपली स्वतःची जबाबदारी ठरते.प्रगतीच्या दिशेने वेगाने पाऊलं उचलणाऱ्या भारतात अजूनही अंधश्रद्धेचा जबर पगडा आहे. आणि यात कमी शिक्षित लोकांपेक्षा अधिक शिकलेली लोकं जास्त बळी पडल्याचं दिसून येतं. समस्या सगळ्यांनाच असतात. पण त्यातून लवकर बाहेर पडण्याच्या नादात लोक चुकीच्या दिशेने भरकटत जातात.

समाजात एकाहून एक फसवेगिरी करणारे लोक अश्याच अडचणीत सापडलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. आणि लाखोंचा गंडा घालतात. कधी कधी कोणाच्या जीववरही बेततं. अशावेळी आपल्या विवेकबुद्धीने, येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणं ही आपली स्वतःची जबाबदारी ठरते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अंकित सिंगने स्वतःला प्रभावशाली तांत्रिक असल्याचा दावा करत महिलेला तिचे कुटुंब मोठ्या संकटात असल्याचे पटवून दिले. अंकितने सांगितले की जर विशेष पूजा आणि भूतविद्या केली नाही तर तिचे आईवडील आणि भाऊ मरू शकतात. महिलेच्या भीतीचा फायदा घेत आरोपीने तिच्याकडून सुमारे २० लाख रुपये रोख आणि २० लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लुटले.गुन्हे शाखेचे एडीसीपी शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी अंकित सिंहला अशोका गार्डन परिसरातून अटक करण्यात आली आहे. तपासात असे दिसून आले की, त्याने हे दागिने त्याच्या घरमालकाच्या, सनी अवस्थीच्या मदतीने आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आयआयएफएल गोल्ड लोनमध्ये गहाण ठेवले होते. पोलिसांनी दोन्ही बँकांमधून दागिने आणि संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. या कटात मदत केल्याच्या आरोपाखाली सनी अवस्थीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सनीच्या घरातून काही दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.या प्रकरणातील आणखी एक आरोपी अंकित सिंगचा मामा मोहित सिंग याला पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी भागातून अटक केली आहे. चौकशीदरम्यान मोहितने कबूल केले आहे की अंकितने त्याला ५.४० लाख रुपये रोख दिले होते. याशिवाय वेगवेगळ्या तारखांना फोन पे द्वारे मोहितच्या खात्यात ३.६० लाख रुपये पाठवण्यात आले होते. अंकित सिंगच्या जबाबानुसार, त्याचा भाऊ आशू सिंग आणि रूम पार्टनर लकी पांडे काही रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार आहेत. भोपाळ क्राइम ब्रांचचे पथके दोघांच्याही शोधात छापे टाकत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.