कल्याणमध्ये तुफान राडा! ऑन-ड्युटी ट्रॅफिक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये जुंपली, व्हिडिओ व्हायरल.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मयूर केणे सचिन ओंबासेंच्या शर्टचा कॉलर धरून रस्त्याच्या मधोमध त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. पोलिसांनीही त्याला मारहाण करून प्रतिसाद दिला आणि दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. कल्याण-शहाड रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडीदरम्यान कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस सचिन ओंबासे आणि मयूर केणे नावाच्या दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली. वाहतूक कोंडी दरम्यान दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याचा आरोप आहे. या दरम्यान पोलिसांनी त्याला पकडले असता, प्रत्युत्तरात दुचाकीस्वाराने रागाच्या भरात पोलिसांवर हल्ला केला.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मयूर केणे सचिन ओंबासेंच्या शर्टचा कॉलर धरून रस्त्याच्या मधोमध त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. पोलिसांनीही त्याला मारहाण करून प्रतिसाद दिला आणि दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या हाणामारीत, रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मध्ये पडून हाणामारी थांबवली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यात मयूर केणे याच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप या वादावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. कल्याण-शहाड पुलावर वारंवार होणाऱ्या गर्दीबद्दल स्थानिकांनी तक्रार केली आहे आणि योग्य वाहतूक व्यवस्थापनाची मागणी केली आहे.दुसरीकडे, बाईक वेगात चालवून जोरात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक झाली. सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीत रात्री दहानंतर सुमारे अर्धा तास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. रस्त्यावरील अनेक वाहनं आडवी करण्यात आली. यावेळी गल्लीमध्ये दगडांचा खच पडला. या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन मुले बिपीन आणि संदीप हे जखमी झाले. दुसऱ्या गटातील रियाज नदाफ (वय २१, रा. घोंगडे वस्ती) याच्यासह चार युवक युवकही जखमी झाले आहेत.सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरात हि घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घोंगडे वस्ती परिसरातील रहिवासी रऊफ इनामदार आणि त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत समोरच्यांना रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो? यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.