उजनी जूनमध्येच भरणार! आषाढीपूर्वीच पंढरपुरात पुराचा धोका, भीमेकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा.

 दौंड येथून धरणात ७२ हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे. धरणातील पाण्याची पातळी ६८.२० टक्के इतकी झाली होती. येत्या दोन दिवसांत उजनी शतक पार करील, असे सांगण्यात आले.पुणे शहर आणि जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील बंधाऱ्यातून पाण्याचा मोठा लोंढा येत असल्याने उजनी धरणातील पाण्याच्या पातळतीत झपाट्याने वाढत होत आहे. दौंड येथून धरणात ७२ हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे. धरणातील पाण्याची पातळी ६८.२० टक्के इतकी झाली होती. येत्या दोन दिवसांत उजनी शतक पार करील, असे सांगण्यात आले.पुणे जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार असल्याने तेथील सर्व धरणे भरली असून, तेथून नद्यांमध्ये पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी भीमा नदीतून दौंडमार्गे उजनीत येत आहे. उजनीवरील ताण कमी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासून ११ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.उजनी धरणात मिसळणार्‍या दौंड विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून, ७० हजार क्युसेकपर्यंत वाढल्याने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. शुक्रवारी (२० जून) दुपारी तीन वाजता एक हजार ६०० क्युसेक, तर सायंकाळी पाच वाजता दहा हजार क्युसेक असा ११ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पावसाळा आणखी चार महिने शिल्लक असल्याने पंढरपूर येथे पुढील काळात पुरस्थिती कायम राहणार आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली असली, तरी बंडगार्डन येथील विसर्ग सकाळी घटला आहे. बंडगार्डन येथून सकाळी नऊ वाजता २४ हजार क्युसेक होता. विसर्ग रात्री ३८ हजार क्युसेकपर्यंत गेला होता. सकाळी त्यात घट झाली आहे. तर खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कायम असून, १५ हजार ९२ क्युसेकचा विसर्ग मुळामुठा नदी पत्रात सोडण्यात येत आहे.यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे.सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ९८, तर महाबळेश्वरला ९४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात २४ तासांत जवळपास साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील साठा ३२ टीएमसीवर पोहोचला आहे. तर पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाने नुकसान वाढू लागले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर मातीचा भराव वाहून आला आहे. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यातच कास, बामणोली, कांदाटी खोरे, नवजा, कोयनानगर भागात संततधार पाऊस आहे. यामुळे जनजीवन विस्कळित होण्याची वेळ आली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर तर नवजा ९८ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ९४ मिलिमीटर पाऊस पडला.कोयना धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ५१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ३२.५१ टीएमसी झाला आहे. ३०.८९ टक्के धरणे भरले होते. पण धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करण्यात आले आहे. त्यामधून एक हजार ५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात प्रथमच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या रहिवाशांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.