शेत तलावात बुडालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू, अंदाज चुकला अन् होत्याचं नव्हतं झालं.

 रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील बेणसे गावात दुर्दैवी घटना घडली. दोन सख्ख्या भावांसह तीन तरुण शेततलावात बुडाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघेही तरुण पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. महाराष्ट्रातील पळस्पे ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागोठणे गावापासून तीन ते चार किलो मीटर अंतरावर असणाऱ्या बेणसे गावातील मौजे मुस्लिम मोहल्ला येथील दोन सख्या भावासहीत कुटुंबातील अन्य एक असा तीन जणांचा बुडाल्यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची माहिती नागोठणे पोलिसांनी दिली आहे.पेण तालुक्यातील बेणसे गावातील मुस्लिम मोहल्ला येथील जाकीर अत्तर (१७), मिझान जाकीर अत्तार (१४), अश्फाक अली (१६) हे तिघेजण रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी ते नागोठणे या रस्त्यावर असणाऱ्या बेणसे सिध्दार्थ नगर गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात (सालडोली) या ठिकाणी दुपारच्या पोहण्यासाठी गेली होती. या तिघांचा पाण्याचा अंदाज चुकला असल्याने ते गटांगळ्या खात बुडू लागले. याची माहिती ग्रामस्थ आणि नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी सचिन कुलकर्णी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत त्यांना तलावाबाहेर काढण्यात आले.

शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे आले. बुडालेल्या तरुणांना नागरिकांनी खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तलावात बुडालेले जोहेब जाकीर अत्तर , मिझान जाकीर अत्तार, अश्फाक अली या तिघांना बाहेर काढल्यानंतर नागोठणे पोलिसांनी त्यांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथील कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार केले.तद्नंतर अधिक उपचारासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारे वडखळ पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या संजीवनी रुग्णालयातील अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते . मात्रमात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी तिघेही मृत झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले.

या तिघांपैकी पहिला मृत्यू दिनांक 20 जून 2025 रोजी रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी झाला तर दुसरा मृत्यू हा रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी झाला तर तिसऱ्याच मृत्यु हा दिनांक 21 जून 2025 रोजी रात्री दोन वाजून 53 मिनिटांनी झाला असल्याची माहिती संजीवनी रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तातडीने भेट घेत सदर मुलावर योग्य ते उपचार करण्याची सूचना दिली होती.यावेळी स्थानिक तरुणांनी वेगाने मदतकार्य केले. अत्तार कुटुंबातील दोन सख्ये भाऊ या दुर्घटनेत मयत झाल्याने अत्तार कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अली कुटुंबातील एकुलता एक तरुण या घटनेत मयत झाल्याने अली कुटुंब देखील दुःखाच्या खाईत लोटले गेलेय. बेणसे विभागात इतकी मोठी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली असल्याने सर्वत्र शोक आणि हळहळ व्यक्त होतेय.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.