भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या दुसरा दिवसही संपला आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम सत्रात संघ 471 वर सर्वबाद झाला. ऋषभ पंतच्या शतकावर सुनील गावस्करांनी एक मोठे विधान केले आहे.भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या दुसरा दिवसही संपला आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम सत्रात संघ 471 वर सर्वबाद झाला. भारताकडून तीन फलंदाजांनी शतक झळकावले. ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांनी शतक ठोकले. ऋषभ पंतच्या शतकावर सुनील गावस्करांनी एक मोठे विधान केले आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले. हे पाहून माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचा सूर बदलला. त्यांनी पंतचे कौतुक केले आणि त्याला Superb म्हटले. गावस्कर यांनी अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पंतला मूर्ख म्हटले होते. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्यानंतर 26 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने अतिशय वाईट शॉट खेळून आपली विकेट गमावली.कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले दिग्गज सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतवर जोरदार टीका केली होती. पंतचा वाईट शॉट पाहून ते रागात तीन वेळा मूर्ख, मूर्ख, मूर्ख असे म्हणाला. त्याचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला.









