भिवंडीतील ठाणे बायपास रोडवर भीषण अपघात;कंटेनरच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू.

भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील बॉम्बे ढाबा या ठिकाणी एक अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात भिवंडीतील दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील बॉम्बे ढाबा या ठिकाणी एक अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात भिवंडीतील  दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद असद अफताब आलम (रा.गैबी नगर) आणि आजम सईद अन्सारी (रा.अन्सार नगर) असे या दोघा मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद असद आफताब आलम आणि आजम सईद अन्सारी असे दोघे रात्री उशिरा भिवंडीहून मुंब्राकडे दुचाकीवर जात होते. त्या दरम्यान, भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खारेगाव टोलनाका येथील बॉम्बे ढाबा परिसरता भरधाव कंटेनर चालकाने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे युवक खाली पडले.

त्यामध्ये त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने दोघं गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच या जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जबर मार बसल्याने तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र धडक दिल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन  पसार  झाला आहे. सध्या पोलीस या फरार चालकाचा ही शोध घेत आहेत.गुवाहाटीहून मुंबईला येण्यासाठी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांचं अकासा एअरलाइन्सचं विमान आहे. या विमानाने येण्यासाठी गुवाहाटीला गेलेले मुंबईकर प्रवासी शनिवारी दुपारीच विमानतळावर दाखल झाले.

सुरुवातीला हवामान खराब आहे, तसंच इतर तांत्रिक कारणं देत विमान उशिराने असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि अकासा एअरलाइन्सने त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती दिली.पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे आता उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त करताच आजची रात्र तुमची हॉटेलमध्ये सोय करतो आणि उद्या सकाळच्या विमानाने तुम्हाला मुंबईला पाठवलं जाईल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र यावरही अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट विमानतळातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यावर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने प्रवाशांची समजूत काढत त्यांना सकाळच्या विमानाने जाण्याची विनंती केली आणि सकाळी साडेआठ वाजताच्या विमानाने हे प्रवासी अखेर मुंबईला रवाना झाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.