‘पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं…! हिंदी भाषा सक्तीवरुन लेखकाची सरकारला जोरदार चपराक.

राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्यी सक्ती केल्यापासून राज्यात वातावरण तापलं आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयाला चांगलाच विरोध दर्शवला आहे.मुंबई- सध्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे बरेच वादविवाद होताना पाहायला मिळता+यत. भाषेवरून राजकारण चांगलंच दिसून येत आहे. बरेच जण सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये केवळ सर्वसामान्यांचा समावेश नसून बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश असल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे , समीर चौगुले यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हिंदी भाषा सक्तीकरणावर निषेध व्यक्त केलेला. आता लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

अरविंद यांनी आपल्या पोस्ट मधून सरकारवर टीकास्त्र सोडले.अरविंद जगताप हे चला हवा येऊ द्या मधल्या पोस्टमन या पात्रामार्फत पाठवल्या जाणाऱ्या पत्राच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणामुळे बरेचदा त्यांचे कौतुक होते. आता अरविंद जगताप यांनी सरकारची कान उघडणी करण्यासाठी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं म्हणा ना! सध्या अरविंद जगताप यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.हिंदी भाषा सक्तीकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कडाडून विरोध दर्शवला.

ते सतत वेगवेगळ्या भाषण आणि सोशल मीडिया पोस्ट मधून हिंदी भाषेला विरोध दर्शवत आहेत. गुजरात मध्ये सुद्धा तिसरी भाषा पर्याय म्हणून हिंदीला स्थान नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल त्यांनी उठवला आहे.काही दिवसांपूर्वी सरकारने जीआर काढले होते ज्यामध्ये राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच हिंदी भाषा व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असेल तर त्यासाठी वीस पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत. अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदीच भाषा शिकावी लागेल असं त्या जीआर मध्ये स्पष्ट केलेले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.