जागतिक योग दिन उत्साहात साजरा – ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिला आरोग्याचा संदेश .

जागतिक योग दिन उत्साहात साजरा – ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिला आरोग्याचा संदेश .दि. २१ जून, २०२५ रोजी डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या घोषवाक्याने आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक जे. ए. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचालित विद्यालयाच्या आवारात विविध योग व प्राणायाम प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक नंदकुमार चौधरी, गोविंद काकाश्री चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत योगासने सादर करत आरोग्यदायी जीवनशैलीचा आदर्श सादर केला.

मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विविध प्राणायाम व योगासने शिकवली आणि विद्यार्थ्यांना नियमित योगाचा सराव करा, निरोगी रहा, बुध्दी तल्लख बनवा असा संदेश दिला.कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक टी. पी. घुले आणि अन्य शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनीही एकाग्रतेने योग प्रात्यक्षिके सादर करत नवीन उर्जा व आरोग्याचे महत्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध योग संचालन, प्रात्यक्षिकांचे समन्वय आणि विद्यार्थ्यांचा सृजनशील सहभाग होता. आभार वाय जे कुरकुरे यांनी मानले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.