साहेब, मी माझ्या मित्राला जंगलात…आरोपी चक्क पोहोचला ठाण्यात, छोट्या वादानंतर उचलले टोकाचे पाऊल.

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरेश होनहागा नावाच्या एका व्यक्तीने आपल्या जिवलग मित्राची हत्या केली आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी, त्यांनी एकत्र दारू प्यायली, वाद वाढला आणि सुरेशने संजय बेहरा नावाच्या मित्राची हत्या केली. पोलिसांनी सुरेशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. मित्रानेच आपल्या जिवलग मित्राचा खून केला. तो फक्त इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पोलीस स्टेशन गाठले आणि चक्क आपण हत्या केल्याची कबुली दिली. सुरूवातीला पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्याने सांगितलेल्या ठिकाणावर पोलीस ज्यावेळी पोहोचले, त्यावेळी खळबळ उडाली. ही घटना 17 जून रोजी घडली. सुरेश होनहागा असे आरोपीचे नाव आहे. मित्राची हत्या करून तो पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपणच मित्राचा खूप केल्याची त्याने कबूली दिली.17 जून रोजी साधारण साडे दहाच्या सुमारास सुरेश होनहागा हा तुर्भे पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलिसांना म्हटले की, साहेब…मी माझ्या मित्राला मारून जंगलात सोडून आलोय…सुरूवातीला त्याचे बोलणे ऐकून पोलीसही हैराण झाले. यानंतर त्याला परत विचारण्यात आले असताना त्याने पुन्हा तेच उत्तर दिले. तात्काळ पोलिसांची एक टीम त्याने सांगितलेल्या तुर्भेमधील जंगलात पोहोचली. यावेळी जंगलात एका दगडाखाली मृतदेह आढळून आला.आरोपीने पोलिसांना माहिती दिली की, ज्याचा मृतदेह तुम्हाला आढळून आलाय तो आणि मी खूप चांगले मित्र होतो. पण मागच्या काही दिवसांपासून आमचे बिनसले होते. घटनेच्या दिवशी पार्टी करायला आम्ही दोघेही तुर्भे जंगलात एका धबधब्यावर गेलो. दोघांनी मिळून खूप दारू पिली. दारू पिल्यानंतर आमच्यामध्ये परत वाद सुरू झाला. त्यानंतरच मी संजय बेहरा याचा कटरने गळा चिरून त्याची हत्या केली. हत्या करण्याचा कट अगोदरपासूनच मनात असल्याचीही आरोपीने माहिती दिली.संजय बेहराची हत्या केल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात सुरेश पोहोचला. याबाबतची माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपी सुरेश होनहागा याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. दोघांमध्ये अगोदर नेमक्या कोणत्या कारणावरून बिनसले होते, याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.