राजाला संपवल्यानंतर सोनमचा हजार किमीचा प्रवास, बुरखा घातलेला अन् जेवणासाठी न थांबता…; कारचालकाने सर्वच सांगितलं.

राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी गुंता सुटत चालला आहे. सोनम रघुवंशीचा काळा चेहरा समोर येत आहे. मेघालयात हनिमून दरम्यान पती राजाची हत्या केल्यानंतर गुप्तपणे उत्तर प्रदेशातून निघाली होती तेव्हा सोनमने बुरखा घातला होता, असे कार चालकाने सांगितले आहे.राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी गुंता सुटत चालला आहे. सोनम रघुवंशीचा काळा चेहरा समोर येत आहे. मेघालयात हनिमून दरम्यान पती राजाची हत्या केल्यानंतर गुप्तपणे उत्तर प्रदेशातून निघाली होती तेव्हा सोनमने बुरखा घातला होता, असे कार चालकाने सांगितले आहे. सोनमला इंदूरची सीमा ओलांडून उत्तर प्रदेशात सोडणाऱ्या दोन चालकांपैकी एकाने हे सांगितले आहे. सोनमने आपल्या प्रियकरासोबत मोठे प्लॅनिंग करुन पती राजाचा काटा काढला. पण नंतर ती स्वत:च पोलिसांना शरण गेली.

सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्या पोलीस कोठडीत गुरुवारी दोन दिवसांची वाढ कऱण्यात आली आहे. तर धक्कादायक म्हणजे मारेकरी साथीदार हे राजचे बालपणीचे मित्र आहेत. त्यांनाही पंधरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान शिलाँग पोलीस तपासासाठी इंदूरला आले असून सखोल तपास सुरु आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशला घेऊन जाणाऱ्या मोहित आणि पीयूष या दोन वाहन चालकांचा शोध घेतला.चालक मोहित चौकशीसाठी गुन्हे शाखेसमोर हजर झाला होता. त्याने पोलिसांनी सांगितले की, ‘पीयुषला राजने कामावर ठेवले. ८ जूनला त्यांनी एर्टिगा कारमधून प्रवास सुरु केला.’ पती राजाचा कुजलेला मृतदेह मेघालयातील सोहरा येथील दरीत आढळून आला होता. पोलिस पथक सोनमला शोधण्यासाठी कठीण प्रदेशातून खराब हवामानाचा सामना करत तपास करत होते.पोलिसांच्या माहितीनुसार, मोहितने जबाबात म्हटले की, सोनमने प्रवासादरम्यान बुरखा घातला होता. तर वाराणसीच्या १ हजार किमीच्या प्रवासादरम्यान तिने वाटेत कुठेही थांबण्यास नकार दिला आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्यासही मनाई केली. ते त्याच रात्री पवित्र या शहरात पोहोचले.यातच राजाच्या हत्येचा कट कुठे शिजला हे ही आता समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी इंदूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये राजाला मारण्याचा कट रचला होता. पोलीस आता रेस्टॉरंट मालक आणि सोनमच्या काही मित्रांची चौकशी करत आहेत. राजा रघुवंशीच्या हत्येचा भयानक कट इंदूरमध्ये रचण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम आणि तिच्या सहकाऱ्यांनी सुपर कॉरिडॉरमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसून हत्येचा कट रचला होता.a

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.