राज्याच्या शालेय शिक्षण विभागात रात्री उशिरा निर्णय घेण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होत आहे. शिक्षण विभागाने रात्री उशिरा दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले, ज्यात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करणे आणि हिंदी ही सर्वसाधारण तिसरी भाषा असेल, असे शुद्धीपत्रक काढले. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्य सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने अघोरी पूजा केल्याचा आरोप होत असतानाच, आता शालेय शिक्षण विभागात ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू आहे. या विभागातर्फे राज्याच्या शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारे दोन मोठे निर्णय रात्री उशिरा जाहीर झाले.










