पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा मुठा नदीत विसर्ग केला जात आहे. अशावेळी मात्र काहीजण नदीपात्रात उतरुन जीव धोक्यात टाकत आहेत, पण पोलिसांनी अशांना चांगलाच धडा शिकवला आहे.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा मुठा नदीत विसर्ग केला जात आहे. परिणामी मुठा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अशावेळी मात्र काहीजण नदीपात्रात उतरुन जीव धोक्यात टाकत आहेत. त्यामुळे पोलिसांनी थेट नदीकाठी पोहोचत त्यातील काही तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे.
पोलिसांनी तडख नदीकाठी पोहोचून तरुणांना धडा शिकवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गुरुवारी सकाळी काही तरुण जीव धोक्यात घालून नदीपात्रात अंघोळ करत सेल्फी काढत होते. पोलिसांनी त्यांना बाहेर यायला लावले आणि उठाबशा काढायला लावल्या आहेत. तर पुन्हा नदी पात्रात उतरल्यास कठोर कारवाईचा करण्याचा इशारा दिला आहे.तुडुंब भरुन वाहणाऱ्या नदीपात्रात अंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सध्या पाण्यात उतरुन हुल्लडबाजी केल्यामुळे अनेक तरुणांनी आतापर्यंत जीव गमावल्याचे आपण पाहत आहोत. अनेकदा खबरदारीचा इशारा देऊनही तरुण नदीपात्रात उतरतात, जे त्यांच्या जीवावर बेतणारे ठरते. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.









