भुसावल थर्मलला प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश; राख व वायू प्रदूषणावर प्रभावी कारवाईचे आदेश :मोठी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्कीची शक्यता .

भुसावल थर्मलला प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश; राख व वायू प्रदूषणावर प्रभावी कारवाईचे आदेश :मोठी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्कीची शक्यता .दिपनगर येथील व्यापारी वीज निर्मिती केंद्र (२१० मेगावॅट, ५००x२ मेगावॅट, ६६० मेगावॅट) बाबत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र साहेबराव चौधरी तसेच पर्यावरण तज्ज्ञ प्रा. के. पी. चौधरी यांनी या संयंत्राचा शेती, शेतमजूर, वनस्पती, नदी, ओढे, गावचे वनसंपत्ती, वनउत्पन्न व जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रभाव पडत असून शेतकऱ्यांच्या जमिनी कमी रेडीरेक्नर दराने अधिक प्रमाणावर संपादित करून शेतकरी व परिसरातील जनतेचे जीवन व शेतीवरील अवलंबित्व असलेल्या रोजगारीचे नुकसान केले गेलेल्या असंतोषाचा अहवाल दिला होता. शेतकरी बांधवांमध्ये असलेल्या असंतोषाची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती नेमली. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) भुसावल थर्मल वीज केंद्रास पर्यावरण संरक्षणाकरिता कठोर आदेश दिले आहेत.

कारखान्याने एकक क्र. ३ (२१० मेगावॅट) प्रभावी रीतीने सुरु ठेवावे, वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली सुधारावी, ऑनलाइन राख विश्लेषक बसवावा, इफ्लूंट शुद्धीकरण केंद्र योग्य स्थितीत असावे असं आदेशाने बजावलं आहे.राख वाहतूक करताना आच्छादित वाहने वापरणे गरजेचे असून राख slurry पाईप्स गळती-मुक्त असणे बंधनकारक केले गेलेल्या आहेत. वेल्हाळे गावातील राख बंधारा भागातील उत्सर्जन आटोक्यात ठेवण्यासाठी कारखान्याने योग्य उपाय योजना करणं गरजेचं असून अनधिकृत राख बाहेर नेण्यावर कारवाईचे आदेश दिले गेलेल्या आहेत.

तसेच कारखान्याने राख क्रियाशील योजना तयार करून दर आठवड्याला अहवाल सादर करणं, जुन्या राख बंधाऱ्यातील राख साफ करून जवळच्या नदीत जाणारा मार्ग बंद करणं असं आदेशाने सूचित केले आहे. आदेशांचे पालन न झाल्यास कारखान्याचा कारभार थांबविण्यात येईल व ५ लाख रुपये सुरक्षा अनामत जप्त केले जाण्याचा इशारा दिला आहे.या आदेशास महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेली असून आदेशावर नाशिकचे प्रादेशिक अधिकारी सन्माननिय एल. एस. भड यांनी सही केलेली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.