सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

जळगाव  समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून एलईडी चित्ररथ जिल्ह्यात फिरणार आहे. या चित्ररथातून सामाजिक न्याय विभागांच्या महत्वाच्या योजनांची माहिती असलेले व्हिडीओ, यश कथा, योजनांचा अर्ज कसा करायचा, त्याला लागणारे कागदपत्र ही माहिती या एलईडी च्या माध्यमातून दाखविली जाणार आहे.हा दृकश्राव्य रथ ज्या ज्या गावात जाईल तिथल्या लोकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना बघून समजून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.