पोटगीसंदर्भात उच्च न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा; करुणा मुंडे म्हणतात, ‘मुंडेंना मला अर्धी रक्कम…’

करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोटगीसंदर्भात मला दिलासा मिळणार असल्याचे करुणा मुंडेंनी स्पष्ट केले. करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंची पोटगीच्या मागणीची याचिका रद्द करावी, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण उच्च न्यायालयाने पोटगी संदर्भातील अंतरिम आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळणार आहे. पण पोटगीसंदर्भात मला दिलासा मिळणार असल्याचा करुणा मुंडेंनी केला आहे. करुणा म्हणाल्या, न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांचे आभार मी मानते.

माध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे म्हणाल्या, कोर्टाने काल मुंडेंना मला ५० टक्के रक्कम देण्यासाठी सांगितले आहे. माझी ३५ ते ४० लाख रुपये रक्कम असेल, त्यातील अर्धी रक्कम कोर्टात जमा करायला सांगितले आहे. म्हणजेच २१ ते २२ लाख रुपये रक्कम कोर्टात भरायला सांगितली आहे. आणि माझ्या मुलीची १०० टक्के रक्कम भरायला सांगितली आहे.करुणांनी असाही दावा केला की, ‘मुंडेंना मला पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे ते कोर्टात गेले. माझ्याकडे ५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती. ती मला विकायला लावली. निवडणुकीत माझं मंगळसूत्र देखील मी यांच्यासाठी घाण ठेवले आणि ते धनंजय मुंडेला पैसे दिले होते. मुंडेला २७ वर्ष झाले मी ओळखते.

त्यांना पैशांची काही गरज नाही, मात्र त्यांच्या मागे असलेली दलाल गँग आहे, त्यांच्यामुळे ते चुकीचे वागत आहेत. वाल्मिक कराड, तेजस ठक्कर, कृष्णा आंधळेचा खून झाला असेल. अजून तो सापडत नाही याचा अर्थ त्याचा खून झाला असणार, असे गंभीर आरोपही करुणांनी केला.वाल्मिक कराडला येरवडा जेलमध्ये पाठवा यासाठी माझे कार्यकर्ते अजित पवारांना सातत्याने निवेदन देत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनतेला आव्हान करत आहे, घाणेरडे लोक ज्यांचे फोटो बॅनरवर फोटो आहेत त्यांना निवडून देऊ नका, असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.