पालखी सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा फौजफाटा, अवजड वाहनांना 3 दिवस पुण्यात प्रवेशबंदी.

पोलिस नियंत्रण कक्षातून या सर्व ठिकाणांवर देखरेख करण्यात येणार आहे. जड, अवजड वाहनांना तीन दिवस शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (२० जून) शहरात आगमन होणार आहे.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल साडेसहा हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत; तसेच पालख्यांच्या शहरातील आगमनापासून प्रस्थानापर्यंत मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.पोलिस नियंत्रण कक्षातून या सर्व ठिकाणांवर देखरेख करण्यात येणार आहे. जड, अवजड वाहनांना तीन दिवस शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (२० जून) शहरात आगमन होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज पंकज देशमुख व वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी चार सहायक पोलिस आयुक्त, १९ निरीक्षक, ४४ सहायक किंवा उपनिरीक्षक आणि ११९० पोलिस अंमलदार बंदोबस्तावर असणार आहेत.सह चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांना आळा बसावा म्हणून गुन्हे शाखेच्या पथकांना साध्या वेशात तैनात करण्यात आले आहे. यंदा प्रथमच ७१९ दिंडी प्रमुख आणि वाहनचालकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपद्वारे वाहतूक शाखा आणि चालकांमध्ये थेट समन्वय साधला जाणार आहे. पालखी मार्ग, वाहतूक बदल आणि पर्यायी रस्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी https://diversion.punepolice.gov. in या लिंकचा वापर करावा, असे आवाहनही पुणे पोलिस वाहतूक शाखेने केले आहे.शहरात १२४ ठिकाणी वाहतूक वळवली पालखी मार्गावर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष वाहतूक योजना आखण्यात आली आहे.

शहरातील १२४ ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी ‘डायव्हर्जन पॉइंट्स’ तयार करण्यात आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३८ ठिकाणांसह एकूण २३० ठिकाणी वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, प्रमुख ठिकाणी पार्किंगचीही विशेष सोय करण्यात आली आहे. रथाचे ‘लाइव्ह लोकेशन’ समजणार भाविकांना पालखीचे अचूक ठिकाण समजावे यासाठी यंदा ‘जीपीएस ट्रेकिंग’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखीच्या पुढे आणि मागे ट्रॅकर बसवण्यात आले असून, यंदा स्थिर ‘जीपीएस प्रणाली’ देखील वापरण्यात येणार आहे. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पालखीच्या रथाचे लाइव्ह लोकेशन वेळेवर समजेल आणि अनावश्यक गर्दी टाळता येईल.पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात सर्व आवश्यक उपाय योजले असून, वाहतुकीसह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करतो.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.