गरिबांचे धान्य दलालांच्या घशात; नागपुरात तांदळाच्या अवैध साठ्यांवर छापे, शंभर क्विंटल माल जप्त.

हसनबाग आणि नंदनवन येथे अवैध साठा करून ठेवलेला शंभर क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. सरकारकडून गरिबांना देण्यात येणाऱ्या मोफत धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम अन्नधान्य वितरण कार्यालयाने हाती घेतली आहे. हसनबाग आणि नंदनवन येथे अवैध साठा करून ठेवलेला शंभर क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला.ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून लाभार्थ्यांना दिले जात आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरण केले जात आहे. अंत्योदय योजनेच्या लाभाथ्यांना महिन्याला कुटुंबनिहाय ३५ किलो धान्य दिले जाते, ज्यात १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ दिला जातो.

प्राधान्य गटातील लाभाथ्यर्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते, ज्यात दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जातो.शहरात ४ लाख २५ हजार ४०९ शिधापत्रिका असून यावर १६ लाख ७३ हजार ४९१ लाभार्थी आहेत. ऑटोरिक्षा आणि मिनीट्रक शहरात फिरवून काही दलाल हे धान्य खरेदी करतात. पैसे अधिक मिळत असल्याने लाभार्थी याला बळी पडतात. हसनबाग येथे ४० क्विंटल आणि नंदनवन येथे ६० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. गोदामांमध्ये ही साठवणूक केली जाते. अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांच्या नेतृत्वात वैभव खैरकर, सागर बावरे, प्रदीप भावे, विनोद वागदे, शिल्पा दरेकर यांच्या पथकाने या कारवाया केल्या.

कारवायांचे सत्र यापुढेही सुरूच राहणार आहे. रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यात १२ प्रकारचे प्रोटिन आहेत. लाभार्थ्यांनी हे धान्य विकू नये. लाभार्थी हे धान्य विकत असतील तर त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. पकडलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांनी कोणाकडून धान्य विकत घेतले, ही माहिती काढली जात आहे. यानुसार लाभाथ्यांवरील कारवाई करण्यात येईल, असे विनोद काळे यांनी सांगितले. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५चे कलम तीन व सातनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.