कोकणात कोसळधार! जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, खेड बाजारपेठ परिसराला पुराचा वेढा.

दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरात पावसामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. खेड शहर बाजारपेठेतील पाणी रात्री दहानंतर ओसरू लागले होते. जगबुडी नदीची पातळीही कमी झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालारत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपेठेसह खेड शहराला पुराने वेढले. कोकणातील अन्य तालुक्यांसह पुणे, नाशिकमध्येही दमदार पाऊस झाला.खेड बाजारपेठेत दुपारी ३.३०च्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खांबतळे व खेड शहरातील चिपळूण नाका येथील १८५ नागरिकांना, ब्राह्मणआळी, कासारआळी, गांधी चौक, बाजारपेठ परिसर येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

‘एनडीआरएफ’चे पथकही दाखल झाले आहे. खेड शहरातील सफा मशिद चौकातही पाणी साचले होते. मंडणगड तालुक्यातील केळवत घाटात मोठे झाड कोसळल्याने हा मार्ग काही काळ बंद होता. दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरात पावसामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. खेड शहर बाजारपेठेतील पाणी रात्री दहानंतर ओसरू लागले होते. जगबुडी नदीची पातळीही कमी झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणातून पाणी सोडण्याची जूनमधील ही पहिलीच वेळ आहे.वरुणराजाने नाशिकमध्ये दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, दीड दिवसात शहरात तब्बल १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते.

गोदेला जूनमध्ये प्रथमच पूर आल्याने सिद्धपाताळेश्वर मंदिराचा केवळ कळसच दिसत होता. या खुणा लक्षात घेऊन गोदाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर या परिसरातील टपऱ्या प्रशासनाने तत्काळ हटविल्या. नाशिक शहर व परिसरात बुधवारपाठोपाठ गुरुवारीही दिवसभरात ६० मिलिमीटर पाऊस झाल्याने शहरे आणि उपनगरांमध्ये चौकाचौकांत गुडघाभर पाणी साचून शहरवासीयांची दाणादाण उडविली. जुने नाशिकमध्ये दोन वाडे कोसळले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.