पुलावर आला, दुचाकी लावली, मोबाईलही काढून ठेवला अन् अचानक तरुणाने…; भयंकर दृश्य पाहून महिलांची पोलिसांत धाव.

लातूरमध्ये तरुणाने मांजरा नदीत उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. दुचाकी आणि मोबाईल पुलावर ठेवून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. लातूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. लातूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत भातखेडा गावाजवळ मांजरा नदीपात्रात उडी मारत तरुणानी आत्महत्या केली आहे. देवणी तालुका येथील एका २८ वर्षीय तरुणानी लातूर तालुक्यातील भास्कर येथील मांजरा नदीच्या पुलावरुन उडी घेतली.

दुचाकी आणि मोबाईल रस्त्याच्या बाजूला ठेवून त्याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.काल बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भातखेडा येथील मांजरा नदीच्या पुलावर दुचाकीवरुन एक तरुण आला. त्याने पुलावर दुचाकी थांबवली. दुचाकीवर फोन काढून ठेवला. त्यानंतर कोणताही विचार न करता थेट मांजरा पुलावरुन नदीपात्रात उडी मारली.तरुणाने नदीत उडी मारल्याचं काही महिलांनी पाहिली. मांजरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गावातील महिलांनी तरुणाने नदीच्या पुलावरुन उडी मारण्याचं पाहिलं. त्यानंतर महिलांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली. यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. कपिल उद्धव शिंगाडे असं नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.नदीत पाणी असल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार तिथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या गावातील महिलांनी पाहिला. त्यांनी गावातील पोलीस पाटलांना घटना कळवली. त्यानंतर ही घटना ग्रामीण पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणाचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. डॉक्टरांनी तरुणाला तपासून त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.लातूर नागपूर राष्ट्रीय महामार्गलगत मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या कुणाल शिंगाडे याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर कुणाल शिंगाडे यांच्या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.