10 रुपयांची फाटलेली नोट अन् राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सोनमचा भाऊ गोविंद अडकणार?

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. याप्रकरणात एका 10 रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरुन आता या प्रकरणाचा गुंता वाढला चालला आहे. मेघालयात हनिमूनला गेलेल्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं मानलं जात आहे. पण, आता या प्रकरणात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणात इंदूर गुन्हे शाखेने अचानक गोविंदला चौकशीसाठी बोलावल्याने प्रकरणाला दुसरं वळण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हवाला व्यवसायाशी संबंधित आहे, सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. परंतु यामुळे हे हत्येचे गूढ अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसून येत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पोलिसांना सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहाच्या मोबाईलमधून फाटलेल्या 10 रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले होते, जे हवाला व्यवहारात पुरावा म्हणून वापरले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार, हे फोटो हवाला नेटवर्कच्या कोडवर्डचा भाग होते, ज्याद्वारे लाखो रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते.राज कुशवाहाने चौकशीदरम्यान हे देखील कबूल केले की तो सोनम आणि गोविंद रघुवंशीसोबत हवाला व्यवसायात सहभागी होता. या नोटांच्या फोटोंमुळे केवळ हवाला कनेक्शनबाबातच नाही, तर खोलवर रुजलेल्या आर्थिक गुन्ह्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असे दिसून आले आहे की सोनम आणि गोविंद यांनी त्यांचे नातेवाईक जितेंद्र रघुवंशी यांच्या बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले. काही खात्यांमध्ये 14 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि पैसे काढल्याचे पुरावे सापडले आहेत.इंदूर गुन्हे शाखेने हवालाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि रोख व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) सोपवले आहेत. ईडी आता मनी लाँड्रिंगच्या अँगलने प्रकरणाच्या खोलवर जाण्याची तयारी करत आहे. इंदूर गुन्हे शाखेने गोविंद रघुवंशी याला चौकशीसाठी बोलावले आहे. गोविंदचा प्लायवूड आणि लॅमिनेशनचा व्यवसाय हा श्री बालाजी अ‍ॅक्टोरियो हा हवालाचे पैसे लपवण्यासाठीचं माध्यम मानलं जातं.पोलिसांनी गोविंदच्या कार्यालयाची आणि गोदामाची झडती घेतली आहे. पोलिसांना तिथून काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. याशिवाय, गोविंदच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. जेणेकरून हवाला नेटवर्कमधील त्याची भूमिका काय होती हे कळू शकेल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.