‘तुमचा वर्धापन दिन आज नाहीच’ शिंदेंच्या शिवसेनेने व्यंगचित्रातून ठाकरेसेनेची खिल्ली उडवली.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. आज राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. त्यामुळे एनएससीआय डोममध्ये खूप गर्दी होण्याची शक्यता आहे.आज शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने वरळीतील एनएससीआय डोममध्ये भव्य मेळावा होणार आहे. आजच्याच दिवशी ठाकरे गटही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत आहे. यावरून शिवसेनेने व्यंगचित्र काढून ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे. कारण, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, उबाठा गटाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली, हे त्यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. आज राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. त्यामुळे एनएससीआय डोममध्ये खूप गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच, उबाठा गटानेही वर्धापन दिन साजरा करायचे ठरवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

कारण, त्यांच्या गटाची स्थापनाच २०२२ मध्ये झाली आहे. म्हणजे, त्यांना दोन वर्षेही पूर्ण झालेली नाहीत.याच मुद्द्यावरून शिवसेनेने व्यंगचित्रातून टोमणा मारला आहे. व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वर्धापनदिनावरून गोंधळलेले दिसत आहेत. तसेच, उबाठा गटाच्या स्थापनेची Wikipedia वरील माहितीही त्यात जोडली आहे. हे व्यंगचित्र शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजेसवर पोस्ट केले आहे. ते खूप व्हायरल झाले आहे.शिवसेनेचे म्हणणे आहे की, “खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे.” त्यामुळे, उबाठा गटाने वर्धापन दिन साजरा करणे हास्यास्पद आहे, असे ते दर्शवतात. “उबाठा गटाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली,” हे त्यांनी वारंवार निदर्शनास आणले आहे.

यामुळे कार्यकर्ते आणि नेते यांच्यात नेमका कोणता कार्यक्रम महत्वाचा मानायचा यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.दरम्यान, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे आणि उद्धव ठाकरे यांनी या इच्छेचा स्वीकार केला आहे,” असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य युतीचे संकेत दिले आहेत. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे मनसेसोबतच्या युतीवर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.