पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी.

अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोच्या भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या दुर्दैवी अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जेजुरी (jejuri) मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे.  दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 42 ए एक्स 1060) जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच 12 एक्स एम 3694 ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत असून त्यावरुन, भीषण अपघाताची दाहकता लक्षात येईल. सोमनाथ रामचंद्र बायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही रा नाझरेकप ता.पुरंदर जि.पुणे, अजयकुमार चव्हाण, रा. उत्तर प्रदेश, अजित अशोक जाधव, रा.कांजळे, ता. भोर, पुणे, किरण भारत राऊत रा. पवारबाकी ता. इंदापूर, पुणे, अश्विनी संतोष येसार, रा. नागणसूर हैद्रे सोलापूर, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी ता. बारामती, पुणे  अशी अपघातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.