नणंदेच्या त्रासामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल, नणंदेने छळल्याचा आरोप.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात मयुरी देशमुख (३१) या महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नणंदेच्या त्रासामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात मयुरी देशमुख (३१) या महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयुरीसोबत तिचा मुलगा विष्णू देशमुख (वय सहा) याचाही मृत्यू झाला.देशमुख कुटुंब मूळचे बुलढाण्याचे असून, गेली काही वर्षे ते पुण्यात वास्तव्यास होते. मयुरी खासगी शाळेत नर्सरीच्या वर्गात शिक्षिका होती. तिचा पती शशिकांत देशमुख बँकेत नोकरीला आहे.

ते कल्पक सृष्टी सोसायटीत राहत होते. घटनेच्या वेळी घरी कोणीच नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मयुरीने मुलाला घेऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. जोराचा आवाज झाल्याने सोसायटीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच आंबेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.मयुरीने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. त्यात तिने नणंदेच्या सततच्या त्रासामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांनी सुइसाइड नोट ताब्यात घेतली असून, त्याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील अनेक हुंडाबळीच्या घटनांवरुन पडदा उठला आहे. सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला छळाला विवाहिता बळी पडत आहेत. यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्याची मागणी होत आहे. विवाहितेवरील अत्याचार थांबावेत, यासाठी सामाजिक स्तरावर सल्लामसलत होण्याची गरज अधोरेखित होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.