माळेगाव कारखान्याच्या याद्या सापडल्या, रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी; बारामतीत वातावरण तापलं.

बारामतीमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी PDCC बँक रात्री उशिरापर्यंत उघडी असल्याचा आणि पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. अजित पवार स्वत: उमेदवार असून त्यांनी आपणच चेअरमन होणार असल्याचं भाषणात सांगितलं होतं. येत्या २२ जूनला मतदान पार पडणार असून त्याआधी दादा आणि तावरेंच्या प्रचारसभा गाजताना दिसत आहेत. मात्र अशातच बारामतीमध्ये आमराई परिसरातील PDCC बँक रात्री उशिरापर्यंत उघडी असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाहीतर पैसे वाटत असल्याचाही आरोप केला गेला आहे. सहकार बचाव पॅनल’चे कार्यकर्ते रंजन तावरे यांनी याबद्दल जाब विचारला आहे.

‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे रात्री बँकेत काय करत होते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी देखील तिथे उपस्थित होते, असा आरोप आहे. तावरे यांच्या म्हणण्यानुसार, बँकेत पैशाची पाकीटं भरण्याचं काम सुरू होतं. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले, मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी होते. सुनील मुसळे यांचे बँकेत अकरा वाजता काय काम आहे? या ठिकाणी पैशाची पाकीट भरायची हा उद्योग या ठिकाणी चालू होता,” असं तावरे म्हणाले.सभासदांची नावं, त्यांच्या नातेवाईकांची नावं आणि जबाबदारी घेतलेल्या व्यक्तींची नावं यादीत असल्याचं त्यांनी सांगितलं. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं नावही या यादीत आहे. “सभासदाचे नाव, त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि त्याची जबाबदारी कोणी घेतली त्याचं देखील नाव आहे. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं देखील नाव आहे.

त्यांची PDCC बँकेत काय जबाबदारी आहे?” असा सवाल तावरे यांनी विचारला आहे.अजित पवार यांनी शासकीय यंत्रणा वापरल्याचा आरोपही तावरे यांनी केला आहे. डुबल हे बारामतीत ठाण मांडून होते आणि त्यांनी पाणी वाटप संस्थांना दम देऊन मदत करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं, शासकीय यंत्रणाचा वापर करेल आणि तसाच वापर इथे चालू आहे,” असं तावरे म्हणाले. डुबल यांनी पाणी वाटपाच्या संस्थेतील लोकांना मदत न केल्यास पाणी बंद करण्याची धमकी दिली, असा आरोप आहे.बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. “बँक साडेपाच वाजता बंद होते. मला फोन आला आणि त्यामुळे मी बँकेत आलो. रंजन काका आणि मी एकाच वेळी आलो. दुसऱ्या मजल्यावर संगणीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे ती लोक बराच वेळ बसत असतात. मात्र, या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या याद्या कशा सापडल्या हे मला सांगता येणार नाही,” असं जगदाळे म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.