पांडुरंगा हे काय रं विपरित घडलं! दिंडीतील ट्रॅक्टर घेऊन आळंदीला चाललेले, चाक बिघडलं अन्.. वाटेत घडला अनर्थ.

पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ दिंडीतील वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झालाअपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या निवृत्ती यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निवृत्ती माकोसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने माकोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. निवृत्ती माकोसे यांचा एसटी बसच्या धडकेत जीव गेला. ते चाक दुरुस्त करण्यासाठी साहित्य आणायला जात होते. रस्ता ओलांडताना भरधाव बसने त्यांना धडक दिली.पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ एक दुःखद घटना घडली. दिंडीसोबत पाण्याचा टँकर घेऊन जात असताना एका वारकऱ्याचा ST बसच्या धडकेत मृत्यू झाला.

निवृत्ती सांडू माकोसे (वय ४७) हे या अपघातात मरण पावले. ते किशोर गावचे रहिवासी होते. ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी साहित्य आणायला जात असताना हा अपघात झाला.निवृत्ती माकोसे हे दिगर, किशोर येथे कुटुंबासोबत राहत होते. ते शेती करायचे आणि त्यांचं घर शेतीवर आणि ट्रॅक्टरवर अवलंबून होता. ते वारकरीही होते. गावातील ह.भ.प. रामू आप्पा नवले महाराज यांच्या दिंडीत ते सहभागी झाले होते. बुधवारी पहाटे ते आळंदीकडे पाण्याचा टँकर घेऊन निघाले होते. पुणे रस्त्यावरील शिक्रापूरजवळ त्यांच्या ट्रॅक्टरचं चाक खराब झालं. चाक दुरुस्त करण्यासाठी त्यांना काही सामान हवं होतं. निवृत्ती आणि त्यांचे दोन सहकारी रस्ता ओलांडून सामान आणायला जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात निवृत्ती माकोसे गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांच्यासोबत असणारे सहकारी थोडक्यात बचावले.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या निवृत्ती यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निवृत्ती माकोसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने माकोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती माकोसे हे रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. “चाक दुरुस्त करण्यासाठी साहित्य गरजेचं होतं. हे साहित्य घेऊन येण्यासाठी निवृत्तीसह त्यांचे दोन सहकारी रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव एसटी बसने धडक दिली,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोक पसरला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.