मेळाव्यांतून प्रचारतोफा धडाडणार! शिवसेना वर्धापन दिनी महापालिकेसाठी शंखनाद होण्याची शक्यता.

मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचे वर्धापन दिन सोहळे आज पार पडणार आहेत. या सोहळ्यांच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या शंखनाद होणार असल्याचे मानले जाते.मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचे वर्धापन दिन सोहळे आज, गुरुवारी होणार आहेत. यानिमित्ताने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे मानले जाते.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला १९ जून २०२५ रोजी ५९ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या शिवसेनेची दोन शकले पडली असून, एक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने षण्मुखानंद सभागहात वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीतील डोम सभागृहात साजरा होत आहे.राज्यात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची, प्रामुख्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मुंबई महापालिकेत गेली अनेक दशके उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वरचष्मा आहे. महापालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप-शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे. तर ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व मुंबईत टिकविण्यासाठी महापालिका पक्षाच्या ताब्यात ठेवायची आहे. त्यामुळे आज होणाऱ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची भाषणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच होणार असल्याचे बोलले जाते.

वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ‘हिंदुत्व आहे गाठिशी, महाराष्ट्र उभा पाठीशी’, असे म्हणत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र आपल्या समाजमाध्यम खात्यावरून त्यांनी प्रसारित केले. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेल्या शिवसेनेला विधानसभा निडवणुकीत भरघोस जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे गटाला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.