मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरा

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीतही पावसाचा जोर आहे. रेल्वे वाहतूक काही प्रमाणात उशिराने सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई, कोकण, पुणे आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मुंबईसह उपनगरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीत पावसाचा चांगलाच जोर आहे. कोकण किनाऱ्यावर मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पसरले आहेत. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसह कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरात बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यांसह पावासाचा अंदाज आहे. वसई-विरार, बोरिवली, अंधेरी, चर्चगेट या भागातही पावसाचा जोर रात्रीपासून कायम आहे.मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक सखल भागात पावसाच्या कोसळधारांनी रस्त्यांवर पाणी साचलं आहे.

त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. दुसरीकडे रात्रीपासून अधून-मधून तर पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे रेल्वे वाहतुकीवरही त्याचा पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटं उशिराने सुरू आहे. बदलापूर, कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत.दरम्यान, मुंबईसह कोकण, पालघर, रायगड, पुणे, नाशिकच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे.

IMD अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रात मान्सून हंगामात पावसाचा सरासरीपेक्षा जास्त अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशाच्या बहुतांश भागांतही चांगल्या पावासाचा अंदाज आहे. याआधी हवामान विभागाने एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात अंदाज वर्तवला होता. त्यात १०५ टक्के पावसाची शक्यता सांगितली होती.. मात्र त्यानंतर त्यात सुधारणा करत हवामान विभागाने आता सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.