धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत या घटनेचा छडा लावला.जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय बालकाची क्रूर हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत या घटनेचा छडा लावून तिघांपैकी दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मुलाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन तिघा जणांनी बालकाला मारहाण करीत चाकूने त्याचा गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. हरदास वास्कले व सुरेश खरते अशी अटक केलेल्यांची नावे असून तिसरा संशयित रिचडिया कटोले फरार आहे.रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील अल्पवयीन बालकाला त्याच्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार त्याचे वडील गजानन महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिली होती.










