सांगलीत खळबळजनक घटना, भर दिवसा दोन गटात मोठा राडा, सराईत गुन्हेगाराकडून हवेत गोळीबार आणि…

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राड्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी मिरज शहरातील एका सलूनमध्ये तोडफोड देखील करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल तपास केला जातोय.सांगलीच्या मिरज येथून बातमी समोर येत आहे. मिरजमध्ये भर दिवसा दोन गटात मोठा राडा झाला आहे. या राड्यावेळी सराईत गुन्हेगाराकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. आरोपी गोळीबार करुन पळून गेला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एका सलून दुकानात हा सगळा प्रकार झाल्याची माहिती आहे.

मिरज चर्चजवळ संबंधित घटना घडली. या ठिकाणी दोन गट समोरासमोर भिडले. यावेळी झालेल्या राड्यावेळी परिसरातील सलूनाची तोडफोड करण्यात आली. विशेष म्हणजे या गदारोळात एका अज्ञात आरोपीने पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मिरज शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. नेमकं काय घडलं? दोन गटात वाद का झाला? आणि कोणत्या दोन गटात हा वाद झाला? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली आणि हवेत फायरिंग झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात कोण कोण जखमी झाले याबाबत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अण्णासाहेब गादेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते, सदर घटनेबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.