गंगाधर सांडू चौधरी शाळेत शाळाप्रवेशोत्सव उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांचे ओक्षण , सेल्फी पॉइंट , बँड पथक , कार्टून , पुष्प वृष्टी , पुस्तक वाटप ,राजगिरा लाडू वाटप कार्यक्रमाचे आकर्षन ठरले . वरणगांव गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरणगांव येथे सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी शाळाप्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक आदरणिय एम. आर. चौधरी सर, पर्यवेक्षक ए. एस. देशमुख सर, सर्व शिक्षक बंधु-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










