महायुतीत वादाची ठिणगी पडणार? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का.

 रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक अविनाश तावडे, उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक माजी नगरसेवक अविनाश तावडे, उद्योजक यशवंत साबळे, विक्रम साबळे यांच्या सहित त्यांच्या सहकाऱ्यानी आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का देत पनवेल येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.आगामी खोपोली नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात असून साबळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत आ. महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वपूर्ण वाटा असणारे साचळे यांच्या भापज प्रवेशाने नगरपालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलणार असल्याची चर्चा सुरू आहे. खोपोलीतील प्रतिथयश उद्योजक यशवंत साबळे, माजी नगरसेवक आणि शेकापक्षाचे माजी शहर चिटणीस अविनाश ताबडे, युवा नेते विक्रम साबळे यांच्यासह सुहास वझरकर, इर्शाद खान, चिराग रावळ, भीमा मोरे, अजिंक्य ताबडे यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यशवंत साबळे यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. साबळे यांचे पिताश्री स्वर्गिय एल. एम. साबळे यांनी खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.यशवंत साबळे यांचे भाऊ तुकाराम साबळे अनेकदा नगरसेवक राहिले असून बहिनी पुष्पा साबळे यांनीही उपनगराध्यक्षा म्हणून काम केले आहे. यशवंत साबळे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे काम केल्याने ते शिंदे गटात जातील अशी चर्चा असताना साबळे यांनी भाजपचे कमळ हाती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. यशवंत साबळे यांचा भाजप प्रवेश आगामी खोपोली नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात असून साबळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा आहे.माजी नगरसेवक आणि शेकापक्षाचे माजी शहर चिटणीस अविनाश तावडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपुर्वी तावडे यांनी शेकापचे चिटणीस पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तावडे यांनी खोपोली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपली छाप पाडली आहे. मी भाजपमध्ये केलेला प्रवेश माझ्या स्वार्थासाठी नसून मी हा प्रवेश खोपोलीच्या सर्वागीण विकासासाठी केला असून खोपोलीचा कायापालट या प्रवेशातून होणार आहे. तसेच लवकरच खोपोलीत भाजपची ताकद वाढण्यासाठी निस्वार्थीपणे करेन, असं यशवंत साबळे म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.