वाटेत काटे का टाकलेस? शेतीच्या बांधाचा वाद टोकाला, रागाच्या भरात शेतकऱ्याने… यवतमाळ हादरलं.

रमेश यांनी रस्त्यावर काटे टाकल्याने त्यांना शेतात जाता आले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी सुधाकर हे दुपारी रमेश यांच्या घरी गेले. दोघांमध्ये वाद झाला.शेतरस्त्याच्या वादातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ तालुक्यातील आकपुरी येथे शनिवारी दुपारी घडली. सुधाकर महादेव बोटरे (वय ४५) रा. धानोरा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.आकपुरी शेतशिवारात सुधाकर बोटरे याचे शेत आहे. त्यांच्या शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर शेतकरी रमेश श्यामराव कुळसंगे (वय ४०) याने काटे टाकल्याने त्यांना शेतात जाता आले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी सुधाकर हे दुपारी रमेश यांच्या घरी गेले. दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात रमेश याने हातातील कुऱ्हाडीने सुधाकर याचावर वार केले.

गंभीर जखमी झालेल्या सुधाकर बोटरे यांना गावकऱ्यांनी तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगलचे ठाणेदार विकास दांडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले.यवतमाळ : केवळ ५० रुपयाच्या वादातून तिघांनी हल्ला करून एक तरुणाची हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उमरखेड तालुक्यातील रखेड गावात घडली. दत्ता चिंतामण बरगे (वय ५५) रा. कोरटा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी श्रीराम तोरकड (वय २३), माधव तोरकड (वय ३५) व गोदाजी तोरकड (वय ७०) रा. कोरटा यांच्यावर दराटी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

भंडारा : शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील निष्टी फाट्याजवळ गुरांनी भरलेल्या वाहनाचा पाठलाग करताना नागभीड पोलिसांचे वाहन आणि जनावरांची वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन उलटले. या अपघातात नागभीड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोविंदलवार आणि चालक जखमी झाले. नागभीडचे पोलिस पथक वाहनाचा पाठलाग करताना पवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आले होते. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण १४ गुरांना वाचवले. या घटनेनंतर पवनी पोलिसांनी आरोपी विनोद नथू मदनकर (४२), यशकुमार महादेव रामटेके (३५), दिवाकर कुंभारे (४५) आणि प्रदीप भुरे (३८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.