इस्रायलबाबत भारत तटस्थ; संयुक्त राष्ट्रे, SCOमधील ठरावांवर मतदानात भाग नाही.

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत युद्धबंदी करावी आणि तणाव निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करावा, अशी भारताची भूमिका आहे. याद्वारे दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न भारताने केल्याचे मानले जात आहे.इस्रायलविरोधात शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) सदस्य देशांमधील चर्चेमध्ये आणि ठरावावरील मतदानात भाग घेणे भारताने शनिवारी टाळले. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत युद्धबंदी करावी आणि तणाव निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करावा, अशी भारताची भूमिका आहे. याद्वारे दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न भारताने केल्याचे मानले जात आहे.शांघाय सहकार्य परिषदेतील इतर सदस्य देशांना आमची भूमिका कळविण्यात आली आहे, असे सांगून निवेदनात म्हटले आहे, की हे विचारात घेऊनच आम्ही एससीओच्या निवेदनापासून तटस्थ राहिलो आहोत.’ एससीओच्या निवेदनात इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला आहे.या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इराण-इस्रायल दरम्यानच्या संघर्षावर शांघाय सहकार्य परिषदेने निवेदन प्रसिद्ध केले आहे. मात्र, भारताची याबाबत वेगळी भूमिका आहे. ती १३ जून रोजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणकडे स्पष्टपणे मांडली आहे.

भारत त्यावर ठाम आहे. संवाद आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करून हा प्रश्न सोडवावा, असे आमचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने त्या दिशेने पावले टाकणे आवश्यक आहे.पश्चिम आशियामधील वाढत्या तणावाबाबत या निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘नागरी वस्त्यांवर अशा प्रकारे आक्रमक हल्ले करणे, ऊर्जा प्रकल्प, वाहतूक सुविधा यांना लक्ष्य केल्यामुळे नागरी जीवितहानी वाढली. हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन आहे. (इस्रायलचे हल्ले) हे इराणचे सार्वभौमत्वाची पायमल्ली असून, त्यामुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेची हानी झाली आहे. त्यातून जागतिक स्थैर्य आणि शांतता यांना धोका निर्माण झाला आहे.गाझावरील ठरावावेळी अनुपस्थित राहण्याच्या सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली आहे. ‘परराष्ट्र धोरण संभ्रमित आहे,’ असे खर्गे यांनी म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री वारंवार घोडचुका करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी त्यांच्याबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी टीकाही त्यांनी केली.इस्रायलने शनिवारी रात्री इराणच्या कंगन बंदरावरील साउथ पार्स वायू शुद्धीकरण केंद्रावर ड्रोन हल्ला केला. ही कंपनी इराणची महत्त्वाची कंपनी असून, याची पुष्टी झाल्यास इस्रायलकडून प्रथमच इराणच्या तेल आणि वायू केंद्रावर हल्ला झाल्याचे स्पष्ट होणार आहे. इस्रायलने याची पुष्टी केली नसून, वाहिन्यांनी ही बातमी दिली आहे.

गाझामधील जीवितहानी तातडीने रोखावी आणि इस्रायलने या ठिकाणी आक्रमक हल्ले त्वरित थांबवावेत, अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडण्यात आलेल्या ठरारावरील मतदानावेळीही भारत तटस् थराहिला. ‘तातडीने, विनाअट आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी करावा आणि जीवितहानी थांबवावी,’ अशा आशयाचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पेनने मांडला. या ठरावाच्या मसुद्यावर मतदान घेण्यात आले. भारतासह १२ देश या वेळी तटस्थ राहिले. १४९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने शुक्रवारी मध्यरात्रीपासून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात तीन नागरिक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले, असे इस्रायलने जाहीर केले. मात्र, या हल्ल्यांमुळे किमान काही इराणी क्षेपणास्त्रांनी तरी इस्रायलची आयर्न डोम ही क्षेपणास्त्र हल्लाविरोधी प्रणाली भेदण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले.इराणचे आणखी दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठारसय्यद माजिद मौसवी नवे हवाईदलप्रमुख नियुक्तआमीर हतामी नवे लष्करप्रमुख नियुक्तइस्रायलकडून आणखी प्रखर हल्ल्यांचा इशाराइराणकडून इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रांचा मारातीन नागरिक मृत्युमुखी, सुमारे ७६ जण जखमीइस्रायलचा सूड घेण्याची इराणचा इशाराइस्रायलच्या हल्ल्यात ७८ लोक मारले गेल्याचा आणि ३२० जखमी झाल्याची इराणची संयुक्त राष्ट्रांत माहिती

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.