मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती, विमान अपघातातून केवळ यूटर्नमुळे बचावले, चौहान म्हणतात…

अहमदाबाद विमान अपघातानंतर घटनास्थळावरील एका कारचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिसून येते की, विमानाचे काही तुकडे कार वर कोसळताच कारने यु-टर्न घेतला. ज्यामुळे कारमधील व्यक्ती सुदैवाने बचावला आहे.अहमदाबाद विमान अपघातानंतर घटनास्थळावरील एका कारचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिसून येते की, विमानाचे काही तुकडे कारवर कोसळणार इतक्यात कारने यु-टर्न घेतला,ज्यामुळे कारमधील व्यक्ती बचावला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. ५३ वर्षीय कार ड्रायव्हर रश्मी चौहान या अपघातातून बचावल्यामुळे ते स्वत:ला ‘जगातील सर्वात भाग्यवान’ म्हणत आहेत. क्षणार्धात त्यांनी कारचा यु-टर्न घेतल्याने त्यांचा जीव वाचू शकला आहे.

कारचालक चौहान हे कलापीनगरचे रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी ते घोडा कॅमपच्या मागील रस्त्याने शाहीबागला जात होते. तेव्हाच विमानाचा आघात झालाच, चौहान यांची कार परिसरात आली आणि त्यांच्या कारच्या काही मीटर अंतरावर एअर इंडियाचे विमान कोसळले.कारचालक चौहान यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘मी साधारणपणे कार चालवत होतो आणि इतक्यात मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. मी अशा भयानक स्फोटाचा आवाज आयुष्यात कधीच ऐकला नाही आणि याचा परिणाम इतका गंभीर होता की विमानाचे काही तुकडे माझ्या कारवर येऊन कोसळले’कारचालक चौहान यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ यु-टर्न घेतला आणि

घटनास्थळाहून स्वत:ला दूर करण्यास यशस्वी ठरवले. त्या रस्त्यावर जर मी काही सेकंद आधी असतो तर… याचा विचार करुनही माझा थरकाप उडतो. देवाच्या कृपेने मी या प्राणघातक परिस्थितून वाचलो, असेही चौहान म्हणाले.दरम्यान, या प्राणघातक अपघातातून विमानातील एकमेव व्यक्ती बचावला आहे. विश्वासकुमार रमेश हे ब्रिटीश नागरिक आहेत, ते यातून बचावले. त्यांची सीट 11A च्या बाजूला आपात्कालीन दरवाजा असल्याने ते विमानातून फेकले गेले, असे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.