वाद सोडवण्यासाठी केलेली मध्यस्थी जीवावर बेतली, घरगुती वादातून चुलत्याला संपवलं; पुण्यात खळबळ.

पुण्यातील चाकण-शिक्रापूरमध्ये हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या चुलत्याला पुतण्याने छातीत रॉड भोसकून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.पुण्यात हत्या, मारामारी, चोरीच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत. दररोज शहरात गुन्हेगारीच्या घटना समोर येत असून पोलिसांसमोर यावर अंकुश मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. अशीच एक हत्येची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) गावच्या पानसरे वस्ती येथे घरगुती वादातून धक्कादायक हत्येची घटना घडली आहे.दशरथ गुलाब पानसरे याने आपला चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तुकारामने हल्ला परतवताना हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी तुकारामचे वडील दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचवेळी पुतण्या दशरथने त्यांच्या छातीत लोखंडी रॉड भोसकून त्यांची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी दशरथ पानसरे याला अटक केली आहे. शुक्रवारी (६ जून २०२५) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने तुकाराम पानसरे यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील बहुळ या गावात दशरथ पानसरे आणि तुकाराम पानसरे हे राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते. हाच वाद शुक्रवारी वाढत गेला, त्यावरून दशरथ आणि चुलत भाऊ तुकाराम यांच्यात वाद झाला.तू तुकारामला का मारतोस साई? असं म्हणत तुकारामचे वडील दत्तात्रय हे मध्ये पडले.

मात्र दशरथ याने त्यांना मारहाण करत त्यांच्या छातीत लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दुसरीकडे तुकारामवर उपचार सुरू आहेत. लोखंडी रॉड हत्येचं शस्त्र म्हणून जप्त करण्यात आलं आहे. दशरथ याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे. स्थानिकांनी अशा घटनांवर नियंत्रणासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.