अतिवेगानं केला घात, भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक; चार तरुणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.

अतिवेगाने चार तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तरुणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. तळोदा ते रोझवा दरम्यान असलेल्या सप्तशृंगी मंदिराजवळ दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर दोन युवकांचा उपचारा यादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. भरधाव वाहन चालवल्यामुळे चार युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे.देवीदास रुबजी पाडवी रा. रोझवा पुनर्वसन ता. तळोदाहा त्याच्या ताब्यातील ( क्र एम. 2326) असा अर्धवट नंबर असलेली मोटार सायकलने दोघा मित्रांसमवेत तळोदा येथे येत होते. तर मजुरीचे काम आटपून विश्वास मोग्या चौधरी रा.रोझवा पुनर्वसन ता.तळोदा हा त्याचे ताब्यातील युनीकॉन मोटार सायकलने ( क्र. एम एच 39, ए एच 5067) मजुरीचे काम आटपून गावाकडे भारताचा असताना.

दोन्ही भरधाव दुचाकी तलावडी ते रोझवा दरम्यान असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळ समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात विश्वास मोग्या पाडवी (वय 22 वर्षे) व देविदास रूपजी पाडवी ( वय 24) हे दोघे जागीच ठार झाल्याची घटना 12 जून रोजी सायंकाळी घडली.अपघातानंतर गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अर्जुन सिमजी पाडवी याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी पोचल्यावर उपचार सुरू झाल्यानंतर त्याचीही प्राणज्योत मालवली.सचिन डेमश्या पाडवी रा. रोझवा याच्या देखील उपचारादरम्यान नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

घटनास्थळी दोन व उपचारादरम्यान दोन अशा एकूण चार जणांच्या या अपघातात बळी गेला आहे.तर करण रमेश पाडवी रा. रोजवा पुनर्वसन या हा गंभीर असून यावर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.याप्रकरणी गोपीसिंग चंद्रसिंग चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास पाडवी व देविदास पाडवी हे दोघेही तरुण कष्ट करून मजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. या अपघातात चार युवक दगावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.