आशिष शेलारांच्या गाडीसमोर मोठा राडा, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये थेट हाणामारी.

 मुंबईत भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे मंत्री आशिष शेलार यांच्या गाडीसमोरच भाजपचे पदाधिकारी समोरासमोर आले. यावेळी मोठा राडा झाला. भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर चालून गेले. एवढंच नाही तर यावेळी दोन्ही गटात हाणामारी देखील झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. त्यामुळे या महापालिकेवर आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे सत्ता राहिलेली आहे. पण आता शिवसेनेत फूट पडली आहे. ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत मुंबईत चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची मुंबईत ताकद आहे हे स्पष्ट झालंय.

ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजप चे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भाजप त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतही युती करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती सुरु आहे तर दुसरीकडे मुंबईतच भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ही गटबाजी थोडीथोडकी नाही तर भाजपच्या दोन गटात आज चक्क मोठा राडा झाला आहे.भाजप नेते आशिष शेलार हे आज कांदिवली येतील जानूपाडा परिसराच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावेळीच भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. इतकंच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आशिष शेलार यांच्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आशिष शेलार यांची गाडी बाहेर पडत असताना दोन गट एकमेकांसमोर भिडले. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली.भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पालकमंत्री आशिष शेलार हे आज जानूपाडूच्या नागरिकांना भेटण्यासाठी आले होते. इकडे मागच्या 50 वर्षांपासून जानूपाडावासी पीडित आहेत. वनजमीन आहे की नाही या गोंधळामुळे त्यांना आज मुलभूत सुविधा मिळत नाही. त्यांना आशिष शेलार आश्वासन देण्यासाठी आले होते की, यापुढे कुठल्याहीप्रकारे वनाचा त्रास होणार नाही. कारण डीपीडीसीमध्ये आशिष शेलार यांनी त्यांचा प्रस्ताव पारित केला आहे. ते केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बातचित करुन या विषयावर तोडगा काढणार आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्याने दिला.”या दरम्यान काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. हा आमचा अंतर्गत विषय असून पक्षाने आणि पक्षश्रेष्ठींनी मला आश्वासित केलंय की, याबाबतची दखल त्यांनी घेतली आहे. यापुढे योग्य ती कारवाई पक्ष करणार आहे. जे घडलं आहे ते पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर घडलं आहे. त्यामुळे मला पक्षाला जास्त सांगायची आवश्यकता राहिलेली नाही. पक्ष योग्य ती कारवाई करणार आहे”, अशीदेखील प्रतिक्रिया संबंधित पदाधिकाऱ्याने दिला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..